Loading...

“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

अहमदनगर | सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली असल्याचा आरोप अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावर मतं मागितली. पण निवडणुकीनंतर त्यांनी हा विषय सोडून दिला, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

Loading...

मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अगोदर साकळाई योजनेला सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र मुख्यमंत्री आणि सुजय विखेंना निवडणुकीनंतर याचा विसर पडला आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साकळाई पाणी योजनेच्या मुद्द्यावरून 9 ऑगस्टपासून उपोषण सुरू करणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभेला बच्चू कडूंची शिवसेना-भाजपशी युती?

-विधानसभा लढण्याबाबत सुरेखा पुणेकर यांची मोठी घोषणा

-‘आषाढीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या ‘पांडुरंगाच्या’ हातात भगवी पताका’

Loading...

-न्यूझीलंडला पहिला धक्का; अवघ्या एका धावेवर एक बाद

-पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती- अण्णा हजारे

Loading...