मुंबई | अभिनेत्री दिपाली सय्यदने पूरग्रस्त भागातील 1000 मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे. दिपालीने सांगली-कोल्हापूर भागाची पाहणी करून पूरग्रस्त लोकांची भेट घेतली आहे. यावेळी 1000 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतल्याचं दिपालीने जाहीर केलं आहे.
दिपाली भोसले-सय्यद फाऊंडेशनकडून पूरग्रस्त भागातील 1000 मुलींचं लग्न करू देणार असल्याचं दिपालीने सांगतिलं आहे. प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रूपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे, असं दिपालीने सांगितलं आहे.
दिपाली सय्यदने याआधी अहमदनगरमधील साकळाई योजने संदर्भातील मागणीसाठी बेमुदत उपोषण केलं होतं. मात्र मंत्री गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर दिपालीने उपोषण मागे घेतलं होतं.
दरम्यान, दिपाली सय्यदने पूरग्रस्त लोकांसाठी 5 कोटी रूपयांची मदत देखील जाहीर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कौतुकास्पद! गावातील तरूणांनी शहिदाच्या पत्नीला नवं घर दिलं बांधून
-पूरग्रस्तांना गायी, म्हशी आणि बैलजोड्या द्या; महेश लांडगेंचं गणेश मंडळांना आवाहन
-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे
-रायगडमध्ये राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना मोठा धक्का
-काँग्रेसकडून 9 वेळा खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याची कन्या शिवबंधनात अडकणार???
Comments are closed.