नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

अहमदनगर | साकळाई योजनेसाठी आता नेत्यांच्या भरवशावर बसू नका, जनतेला एकत्रित करा, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवराज्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिपाली सय्यद यांना दिला आहे.

साकळाई योजनेसाठी आता जनतेच्या रेट्याची गरज आहे. जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिपाली सय्यद 9 ऑगस्टपासून उपोषणास बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली आहे.

दरम्यान, राजकारण्यांच्या नादी लागून सर्वच प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे जनतेची साथ मिळवा. प्रश्न सुटत नाही तोपर्यंत लढत राहा, असं अण्णा हजारेंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शाहरूख खानचा मुलगा करतोय ‘या’ मुलीला डेट?

-काँग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री पुन्हा अडचणीत; भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल!

-साहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही; म्हणून जिथे आहात तिथेच रहा!

-राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; शिवेंद्रराजे लवकरच भाजपात जाणार?

-मराठा आरक्षणाची लढाई पार पाडलीस, आता तू राजकारणात ये!

Google+ Linkedin