“बाबरीवेळी मोदी, शहा कुठे लपून बसले होते, फडणवीस तर पळताना दिसत होते”
मुंबई | राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा गाजत असताना बाबरी मस्जित कोणी पाडली यावरून श्रेयवाद रंगायला सुरूवात झाली आहे. या मुद्द्यांवरून भाजप-सेनेमध्ये जुंपली असताना शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
बाबरी मस्जितवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते, अशी बोचरी टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे. तर बाबरी मस्जितच्या वेळी फक्त हिंदू आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्याच्या पलीकडे कोणीही उपस्थित नव्हतं, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील दिपाली सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, सगळीकडे शांती कायम राहायला पाहिजे. कारण या भोंगे आणि हनुमान चालिसाच्या वादात मोठी लोक मोठीच राहतील. मात्र, श्रद्धांजलीचे फोटो तुमचे लागतील, असं देखील दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
“लाठी चार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेला होता”
शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे तर मानसिकता महत्वाची – प्रविण पाटील
“निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”
“फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यांवर हातोडा मारत होते?”
मोठी बातमी! राज ठाकरेंच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवली
Comments are closed.