मुंबई | उर्फी जावेद (Urfi Javed) ज्या पद्धतीने आली आहे, तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी ती करत आहे, त्या प्रोफेशनली करत आहे का? तिला रस्त्यावर येऊन फोटो काढण्याची परवानगी आहे का?, असा सवाल अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केला आहे.
फॅशन करावी, फॅशनला मोठा वाव आहे. फॅशन कुठेही करू शकता, पण कुठेतरी एक मर्यादा असते. प्रोफेशनल आणि रिअॅलिटी यात फरत आहे. या गोष्टी समजणं गरजेचं आहे, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.
उर्फीला समजवायला हवं, यापुढे परवानगीशिवाय असं करू नको. सोशल मीडियावर एका कायदा येण्याची गरज आहे जिथे अशा पोस्ट करणं कायद्याच्या बाहेर असेल, तर अशा गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.
उर्फीच्या या गोष्टीचं समर्थन करत नसल्याचंही दिपाली सय्यद म्हणाल्या. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकराचे कपडे घालणं योग्य नाही, असं त्या म्हणाल्यात.
महत्त्वाच्या बातम्या-