बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेएनयूमध्ये हजेरी लावत दीपिका पादुकोणने दिला विद्यार्थ्यांना पाठिंबा

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घडनेचे तीव्र पडसाद उमटत असून देशभर संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट देत हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे देशभर वातावरण तापलं आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरुन या घटनेचा निषेध व्यक्त करत आहेत. तसेच सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या घटनेची निंदा केली आहे. यातच दीपिकाने जेएनयूतील आंदोलनाला हजेरी लावत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

अनेक कलाकार सरकार विरोधी भूमिका घेण्यास उत्सुक नसतात. मात्र, दीपिकाने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने तिचे कौतुक होत आहे. असे असले तरी ट्विटरवर #BoycottChhapaak हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. छपक या चित्रपटात दीपिका मुख्य भूमिकेत असून तिच्या चित्रपटावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी चौकशी करण्यासह तोंड लपवून आलेल्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ट्रेंडिग बातम्या-

#BharatBand; कामगार संघटनांची उद्या भारत बंदची हाक

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020

राज ठाकरे भाजपसोबत जाणार? फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत काय ठरलं?

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More