बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिपळूण आणि खेड भागात भीषण परिस्थिती; NDRF च्या तुकड्या तैनात

मुंबई | पावसाने राज्यभर सर्वत्र हजेरी लावली. मात्र कोकण भागातील रत्नागिरीमधील चिपळूण आणि खेडमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे तेथील परिस्थिती अतिशय बिकट आहे. या परिस्थितीचा आढावा घेत राजकीय चक्रे हललीत आणि मदतकार्य सुरू झालं आहे. कोकणासह इतर जिल्ह्यात देखील आता संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे.

रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्यानं एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत मदत व बचावकार्य सुरू आहे. या जिल्ह्यात मदत आणि बचावकार्यासाठी शासनाकडून तत्काळ उपाययोजना सुरू आहेत.

पूरग्रस्त रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या जिल्ह्यातील माहिती घेत आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यात पूरपरिस्थती निर्माण झाली. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यात देखील येत्या काळात पूरजन्य स्थिती निर्णाय होऊ शकते. त्यामुळे पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील बहुतांश नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज करण्यात आली आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाचा आकडेवारी

‘केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन

आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न

‘गरज भासल्यास अमित शहांसोबत बोलणार’; कोकणातील पूर परिस्थितीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More