Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला आपल्यातून जाऊन आता आठ महिने उलटले आहेत. मात्र, त्याच्या चाहत्यांच्या मनात आजही सुशांत जिवंत आहे. आज सुशांतचा 35 वाढदिवस आहे. सुशांतने त्याच्या डायरीत लिहिलेली अनेक स्वप्ने अजून पूर्ण झालेली नाहीत. त्यातील एक स्वप्न केदारनाथचे दिग्दर्शक आणि सुशांतचे खास मित्र अभिषेक कपूर पूर्ण करणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिषेक कपूर आणि त्यांची पत्नी प्रज्ञा यांनी सुशांतचे आज त्याच्या वाढदिवसानिमित्तने एक स्वप्नपूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.सुशांतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आजचा दिवस निवडला आहे. त्यांनी सुशांतच्या वाढदिवशी झाडे लावण्याचे नियोजन केले असून ते आज 1000 झाडे लावणार आहेत.

बॉम्बे टाईम्सशी बोलताना प्रज्ञा म्हणाल्या होत्या की, “सुशांतची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये. सुशांतने बरीच स्वप्ने बघितली होती. आम्ही प्रत्येक स्वप्न तर पूर्ण करू शकत नाही परंतु आम्ही 1000 झाडे लावणार आहोत.”

दरम्यान, सुशांत पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला. सुशांतच्या करिअरमध्ये हा त्याचा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळं त्याला एक ओळख मिळाली. ‘काय पो चे’ त्याचा पहिला सिनेमा होता आणि 2020मध्ये ‘दिल बेचारा’ हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला.

थोडक्यात बातम्या-

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस!

सर्व्हरच बंद पडल्यानं लसीकरणात अडचणी- आरोग्य मंत्री राजेश टोपे

थकीत वीजबिलावरून सरकारला रोहित पवारांचा घरचा आहेर; म्हणाले…

‘कोणतीही अडचण असली तरी बैठकील यायचंच’; दांडीबहाद्दर मंत्र्यांना अजित पवारांनी खडसावलं

पराभव मान्य करा नाही तर लोकंच तुडवतील एक दिवस- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या