बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समीर वानखेडेंना बॉलिवूडवर हल्ला…’; दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

मुंबई | राज्यासह देशभरात सध्या मुंबईतील कथित कार्डेलिया क्रूझ प्रकरण सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी समीर वानखेडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याला पुन्हा एकदा महत्व आलं आहे. नवाब मलिक यांनी याबाबतचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

अनुराग कश्यप यांचा एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनुराग कश्यप यांना या मुलाखती दरम्यान प्रश्न विचारल्यावर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. समीर वानखेडे यांना बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतात. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाविषयी काही वृत्तमाध्यमांकडे तपासाबद्दलची सर्व माहिती एनसीबीकडून अधिकृतपणे जाहीर करण्याच्या आधीच आलेली असते. तसेच ही माहिती उघडकीस आल्यावर एनसीबी त्याला नकार देते, असं अनुराग कश्यप यांनी म्हटलं आहे.

अनुराग कश्यप यांनी पुढं बोलताना म्हटलं आहे, की असा अजेंडा तुम्ही पाहिलात का? समीर वानखेडे यांनी यापूर्वी सीमाशुल्क विभाग आणि त्यानंतर कर विभागात अधिकारी म्हणून काम केलं आहे. त्यांना बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं असा दावा अनुराग कश्यप यांनी समीर वानखेडे यांच्याबाबतीत केला आहे.

दरम्यान, वानखेडे यांनी माझं बँक खातं गोठवलं होतं. मी या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये खेचलं तेव्हा त्यांनी सुनावणीच्या 15 मिनिट आधीच माझं खातं पूर्ववत करण्यात आलं. त्यांना नेहमीच बॉलिवूडशी जोडलेलं रहायला आवडतं, असं अनुराग कश्यप यांनी म्हटलं आहे. मलिक यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहेे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या –

“पाच वर्षात तुम्ही किती काळ परदेशात राहिलात याचा हिशोब द्या”

‘तो एक तेजस्वी तारा होता’; अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली

“नवाब मलिक बोलतात ती वस्तुस्थिती असेल तर…”

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दणका

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More