Director Guruprasad | सिनेइंडस्ट्रीमधून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी गुरुप्रसाद (Director Guruprasad )यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह हा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे.
गुरुप्रसाद रविवारी त्यांच्या बेंगळुरूमधील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. गुरुप्रसाद यांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून रिऍलिटी शोच्या परीक्षकाचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्यांचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचं निधन
गुरुप्रसाद ज्या अपार्टमेंटमध्ये राहात होते तेथील शेजाऱ्यांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांकडे याची माहिती दिली. यानंतर तपास केला असता गुरुप्रसाद यांचा थेट मृतदेहच आढळून आला. गुरुप्रसाद (Director Guruprasad )यांच्या निधनानंतर पोलिसांनी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुप्रसाद हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. रंगनायका या सिनेमाच्या अपयशामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. त्यांच्यावर खूप कर्ज होतं त्यामुळे गुरुप्रसाद नैराश्यात होते, असं समोर येतंय.
दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचे चित्रपट
दरम्यान, 2006 मध्ये गुरुप्रसाद(Director Guruprasad ) यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. ‘माता’ सिनेमात गुरुप्रसाद झळकले होते. त्यांचा एडलु मंजुनाथ हा सिनेमा प्रचंड हीट झाला होता. कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांना अनेक चित्रपटांची नामांकने आणि पुरस्कार ही मिळाले आहेत.
News Title – director guruprasad found dead in bengaluru
महत्त्वाच्या बातम्या-
अजितदादांच्या उमेदवारांना शिंदेंकडूनच आव्हान; आता दोन्ही उमेदवार नॉट रीचेबल
“जिथं त्रास दिला, त्याला पाडायचंच..”, जरांगेंचे मतदारसंघ ठरले; वाचा संपूर्ण यादी
आज सोमवार, महादेव ‘या’ ३ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
“या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र…”, छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
‘…नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करु’, मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीमुळे खळबळ