बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सध्या देशात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना प्राणही गमवावे लागले आहेत. सामान्यांपासून ते मंत्र्यांना देखील आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या घटना समोर येत आहे. त्यातच आता दिग्दर्शक केदार शिंदेने यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासनावर टीका केली आहे.

भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…, अशी पोस्ट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी इंस्ट्राग्रामवर आणि फेसबुकवर पोस्ट केली आहे.

त्याआधी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांने देखील आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. कमीत कमी 1 किलोमीटर तरी हजारो लोक गेटवर आहेत. नुसतीच चेंगराचेंगरी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढं करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये. माणसाला माणसासारखं तरी वागवा महासत्ता होणार म्हणे, महाथट्टा नक्कीच झाली आहे, असं हेमंत ढोमेनं म्हटलं होतं.

दरम्यान, अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि अभिनेता वीर दास यांसारख्या काही सिनेमंडळीनी देखील आता आरोग्य सुविधांवर प्रखरपणे आपलं मत मांडलं आहे.

पाहा पोस्ट-

Photo Courtesy – instragram/ kadaarShinde

थोडक्यात बातम्या-

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

‘या’ शहरात कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून मिळणार ‘इतक्या’ रुपयांची मदत

18 ते 45 मधील फक्त याच नागरिकांना मिळणार अगोदर लस, अत्यंत महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More