मनोरंजन

‘…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

मुंबई | लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी ‘देऊळ बंद’च्या सिक्वलची घोषणा केली असून लवकरच ‘देऊळ बंद 2 ..आता परिक्षा देवाची’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रवीण तरडे यांनी 5 जुलै रोजी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाची घोषणा केली. यावेळी चित्रपटाचे निर्मातेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे रविवारी गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी अन्य कोणताही चांगला दिवस नसल्याचं म्हणत त्यांनी ही घोषणा केली आहे.

आज गुरुपौर्णिमेला आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाची घोषणा करतोय. या घोषणेसाठी आजच्या इतका दुसरा कोणता पवित्र दिवस नसावा, असं म्हणत प्रवीण तरडे यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली.

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच 23 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या