Milk At Night | बऱ्याच जणांना रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सवय असते. लहान मुलांना तर खास आठवणीने दूध दिले जाते. मात्र, रात्रीच्या वेळेला दूध पिणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. दूध पिण्याचे अनेकआरोग्यदायी फायदे असले तरी रात्रीच्या वेळेला पिणे चुकीचे आहे.
रात्री दूध पिण्याचे तोटे
वजन वाढणे : रात्री दूध प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.रात्री एक ग्लास गरम दूध पिणे म्हणजे वजन वाढणे. यामुळे तुमची दैनंदिन कॅलरी संख्या वाढू शकते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
पचन समस्या : दूध रात्रीच्या वेळेला घेतले तर तुम्हाला पचनास त्रास होऊ शकतो, कारण तुमचे शरीर रात्री कोणतीही शारीरिक क्रिया करत नाही. यामुळे तुमच्या पोटातील पचनक्रिया मंदावते. बऱ्याच वेळा अॅसिडीटीचा देखील त्रास होऊ शकतो.
इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम : रात्री दूध घेतल्याने तुमच्या इन्सुलिनच्या उत्सर्जनावरही परिणाम होऊ शकतो. दुधात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे Circadian Rhythm प्रभावित होऊ शकते.जे शरीरासाठी धोकादायक आहे.
कफची समस्या : रात्रीच्या वेळेला दूध घेतले तर कफ होण्याची (Milk At Night) शक्यता असते. जास्त कफ तयार झाल्यामुळे, एखाद्याला श्वासोच्छवासाचा त्रास, घशातील संसर्ग आणि नाक वाहणे याचा त्रास देखील होऊ शकतो.
दातांचे आरोग्य बिघडू शकते : दुधामध्ये साखर भरपूर प्रमाणात असते.त्यामुळे झोपण्यापूर्वी आणि नंतर ब्रश न करता झोपल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. यामुळे दाताला कीड देखील लागू शकते.
News Title – Disadvantages of drinking milk at night
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; मृतांच्या नातेवाइकांकडून संताप
“सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याबाबत डील झाली होती”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गोप्यस्फोट
अभिनेत्री यामी गौतमला पुत्ररत्न; बाळाच्या युनिक नावाची एकच चर्चा, जाणून घ्या अर्थ
अक्षय कुमारने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क; म्हणाला आपला भारत नेहमीच….
“भाजप गरज संपल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”; शरद पवारांनी दिली धोक्याची घंटा