Top News महाराष्ट्र मुंबई

“डिसले गुरूजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांच्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली”

मुंबई | युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा ‘जागतिक शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित मराठमोळे गुरुजी रणजितसिंह डिसले यांनी कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि डिसले गुरूजींनी अनेक विषयांवर चर्चा केली.

पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

डिसले गुरुजी यांना राज ठाकरे यांची शिक्षण क्षेत्राबाबत असलेली आवड चांगली वाटली आहे. महाराष्ट्राचं नाव शिक्षण क्षेत्रात आणखी उंचावण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं डिसले गुरूजी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले रणजीत सिंह डिसले ‘ग्लोबल टीचर’ म्हणून प्रसिद्ध झाले असून त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची वाहवाह होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावत एक चांगला निर्णय येईल”

…तर आम्ही आरक्षण सोडायला तयार- रामदास आठवले

राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार!

…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो- रत्नाकर गुट्टे

शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या