पुणे | ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता कोरोनावर मात करत ते कोरोनामुक्त झाले आहेत. डिसले गुरूजींना पत्रकारांनी कोरोनावर मात करण्यासाठी काही खास ट्रिक?, असा सवाल केला. यावर त्यांनी सर्वांना कानमंत्र दिला आहे.
मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा, आणि योग्य वेळी निदान करुन उपचारांना प्रारंभ केला तर आपण कोरोनावरती यशस्वी रित्या मात करु शकतो, असं डिसले गुरुजी यांनी म्हटलं आहे.
कोरोना मात करण्याजोगा आजार आहे. लोकांमध्ये जरी त्याची भीती असली तरी कोरोनाला घाबरायचे कारण नाही. 80 वर्षाचे वृध्द मात करतात तर युवक तर करूच शकतात. त्यामुळे कोरोनाला घाबरण्याचं कारण नसल्याचं डिसले गुरूजी म्हणाले.
दरम्यान, कोरोनाची थोडीजरी लक्षणे दिसली थंडी, ताप, घसा दुखतोय असे वाटले तर डॉक्टरांना दाखवा. त्यासोबतच जवळच्या दवाखान्यात कोरोनाची चाचणी करून घ्या, असंही डिसले गुरूजी यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”
DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरो
“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”
“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”