बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारवर खापर फोडण्याआधी स्वत: शिस्त पाळा”; बेशिस्त नागरीकांना औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

औरंगाबाद | कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे, परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. ‘कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत असताना त्याचं खापर सरकारवर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम आणि शिस्त पाळली पाहिजे, आपण जिथे राहतो त्या ठिकाणाबद्दल थोडीफार निष्ठा, संवेदनशीलता दाखवली पाहिजे’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं कोरोना नियमांचं पालन न करता बेशिस्तपणे वावरणाऱ्या नागरिकांना खडेबोल सुनावले आहेत.

मास्कचा केवळ शाेभेपुरता वापर करून फिरणाऱ्या व्यक्ती काेराेनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात. कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी कार्यरत पोलिसांवर दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, असे आदेश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी काल प्रशासनाला दिले आहेत. तर, औरंगाबादेत विद्युत शवदाहिनीसंबंधी कृती आराखडा तयार करण्याचे आणि ग्रामीण भागात अँटिजन चाचण्या वाढवण्याचे निर्देशही खंडपीठानं दिले आहेत.

संचारबंदीत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठ्या गावांमध्ये अँटिजन चाचणीची सोय करावी. पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे, आपल्या जिल्ह्यात पुरेसा साठा असावा, अशी अपेक्षा खंडपीठानं व्यक्त केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील 12 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त किंवा अधीक्षक यांनी रुग्णसंख्या, उपलब्ध खाटांची संख्या, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची उपलब्धता, काेविड रुग्णांच्या उपचारांचे बिल यासंबंधीचा अहवाल सादर करावा. तर, काेराेनामुळे मृतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्व स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसवण्याचा पर्याय प्रशासनाने तपासून पाहावा. यासाठी कृती आराखडा तयार करा, असही सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

“भारतीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळू दे”; पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारताबद्दल संवेदना

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More