बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. गड किल्ल्यांच्या रुपात इतिहासाच्या पाऊल खुणा आज महाराष्ट्राची मान उंचावत आहे. जुन्या काळात अनेक राजे आपल्या प्रतिमा चित्रकारांकडून रेखाटून घेत असत. पण दुर्देवाने छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रे आज आपल्याकडे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ एकच चित्र ब्रिटनच्या संग्रहालयात होतं. परंतू आता तीन लघुचित्रे मिनीएचर पेंटिंग प्रकाशात आली आहेत.

परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे 17 व्या शतकातील असून तीन लघुचित्रे मिनीएचर पेंटिंग स्वरूपात आहेत. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथे ही चित्रे सुरक्षितपणे जतन करण्यात आली आहेत.

महाराजांचे तिन्ही चित्र ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ आहेत. हे तिन्ही चित्र गोवळकोंडा शैलीतील असून सतराव्या शतकातील रेखाटली असल्याचं सांगितलं जात आहे. यातील दोन चित्रांवर पर्शियन आणि एका चित्रावर रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलं आहे. या चित्रांमध्ये महाराजांच्या डौलदार पेहरावात दिसत असून महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्यं चित्रात उतरली आहेत, असं इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सर्व चित्र गोवळकोंडा शैलीतील आहे. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. तेथील ही एक प्रचलित चित्रशैली आहे, त्यामुळे याला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. नैसर्गिक जलरंग आणि सोन्याचा वापर करून काढण्यात आली आहेत. त्यामुळं ही चित्रं अमुल्य आहेत.

पाहा चित्र –

थोडक्यात बातम्या-

या देशात तब्बल 900 लोकांना एक्सपायर झालेल्या कोरोना लसीचे डोस

कडक सॅल्युट! हाताला सलाईन असतानाही शिवसेनेचा ‘हा’ खासदार मराठा आंदोलनाला हजर

“ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात; मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू”

“लोक सरपंचपद वाटून घेतात, तसे महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं”

“अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More