बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आधिवेश सुरू झाल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार टीकास्त्र सोडायला सुरूवात केली. सर्व कामकाज रद्द करून स्वप्नील लोणकर आत्महत्येप्रकरणी MPSCच्या मुद्द्यावर चर्चा घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये केली आहे.

सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा व्हायलाच हवी. कारण आज राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या मनातील हा प्रश्न आहे. एमपीएससी आपल्या पावलाने चालतीय, तिला एका स्वप्निलने आत्महत्या केली काय, जगला काय आणि मेला काय. काहीही फरक पडत नाही. एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे म्हणजे स्वैराचार नाही, अशी आक्रमक भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली.

फडणवीसांनी सुरुवातीलाच स्वप्निल लोणकरची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असं हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असं विचारत एमपीएससीवर त्वरित चर्चा घ्यावी, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आज विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर काय पावलं उचलणार आहे, हे जाहीर करावं, असं आव्हान दिलं.

थोडक्यात बातम्या-

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

‘अनिल देशमुख मला असंच मधात बोलले होते आता ते…’; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ

‘स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या’; सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More