बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-सेनेची युती होणार?, ‘या’ भेटीमुळे चर्चांना उधाण

जळगाव | उत्तर महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन या तिन्ही बड्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडालेली असताना भाजप खासदार रक्षा खडसे यांनी गुलाबराब पाटलांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रक्षा खडसे आणि गुलाबराव पाटलांच्या भेटीनंतर जळगावात भाजप आणि सेनेच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेची युती होणार का?, या प्रश्नावर रक्षा खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अशा युतीबाबत वरिष्ठांचे काही आदेश नसल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. राज्यात महाविकास आघाडी-भाजप संघर्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात सेना-भाजप युतीची परिस्थिती राहणार नाही, असंही रक्षा खडसेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान, निवडणुका पुढे कशा लढवायच्या हे नेतेमंडळी ठरवतील, असं सूचक वक्तव्य देखील रक्षा खडसे यांनी केलं आहे. तर गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे वादावर बोलताना महाविकास आघाडी एकत्र असूनही या नेत्यांचा अंतर्गत संघर्ष संपायचे नाव घेत नाही, अशी खोचक टीका रक्षा खडसेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार पडणार, दिवा विझण्यापुर्वी फडफडतो”

सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार

आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार

“…तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”

“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More