मुंबई | राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांना निरनिराळ्या भेटवस्तू देऊन रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ते करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रभादेवीमध्ये रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडी, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येणार असून सध्या सोशल मीडियावर प्रभादेवीतील कोंबडीचे मांस आणि पनीरची जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिक कोरोनाच्या संसर्गामुळे रक्तदान करण्यास तयार होत नाहीत. नागरिकांच्या मनातील हीच भीती ओळखून रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे.
13 डिसेंबर रोजी माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे रक्तदान शिबीर पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; पत्रात म्हणतात…
राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकत्र प्रवास; चर्चांना उधाण
“मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू माझ्या मागे लागलेत”
“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”
रेखा जरे हत्याकांडप्रकरणी महत्त्वाची घडामोड; आता ही व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात