Pankaja Munde | भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचा आज 26 जुलैरोजी वाढदिवस आहे.या निमित्त त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशात त्यांचे (Pankaja Munde) काही बॅनर देखील झळकले आहेत, ज्याची चर्चा राज्यभर होत आहे.
‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’असा उल्लेख केल्याचे अनेक बॅनर बुलढाणा येथे झळकले आहेत. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
“..मुळे पंकजा मुंडे यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाहीत”
पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. भाजपने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी त्यांचा पराभव केला. पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) जवळपास 7 हजार मतांनी पराभव झाला.
पराभवानंतर बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या 3 कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे पंकजा मुंडेंनी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केलं.
पंकजा मुंडेंच्या बॅनरने वेधलं लक्ष
पंकजा मुंडे यांचा 26 जुलै रोजी प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, यावर्षी त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं. तसंच आपल्या प्रेमरूपी एका एसएमएसवर वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद प्रदान द्यावेत असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे या 29 तारखेला बीड जिल्ह्यात दाखल होणार आहेत. भगवानभक्ती गडावरून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
News Title – Discussion of Pankaja Munde banner in Buldhana
महत्त्वाच्या बातम्या-
सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत
‘काळ आला होता पण वेळ नाही’, पुरात अडकलेल्या तरुणाला बचाव पथकाने सुखरूप काढले बाहेर
उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन
महिलांनी आपल्या जीवनात ‘या’ सहा गोष्टी कुणालाही सांगू नयेत; अन्यथा वैवाहिक जीवन..
मुंबईत पावसामुळे दाणादाण, आजही रेड अलर्ट जारी; पोलिसांकडून मुंबईकरांना महत्वाच्या सूचना