बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

नवी दिल्ली |  केंद्र सरकारने 19 नोव्हेंबर रोजी देशात वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात हे कृषी कायदे रद्द होणार आहेत. या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार एक बैठक घेणार असल्याचं समजतंय.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात विरोधी पक्षांनी मतदानाची मागणी केली होती. त्यावेळी लोकसभेत एकूण तीन कृषी विधेयकांपैकी दोन विधेयकं मंजूर करण्यात आली होती. परंतु खुर्चीवर बसलेले श्री. हरिवंश यांनी ते नाकारल्याने आवाजी मतदानाद्वारे कृषी विधेयकं मंजूर करण्यात आली. याच्या निषेधार्थ खासदारांनी सभागृहातील टेबलावर चढून घोषणाबाजी केली.

हे तीन कृषी कायदे रद्द व्हावेत, यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार आहे. मात्र या संदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार चर्चासत्र घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेत कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर जनतेशी संवाद साधणार आहेत. एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय का घेतला?, याची कारणे तोमर जनतेला देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संसदेत हे कायदे रद्द झाल्यानंतर ही विधेयकं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली जाणार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या युनायटेड किसान मोर्चाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. नियोजित निदर्शने सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर कृषी कायद्यांविरोधात निषेध व्यक्त करण्याच्या प्रक्रियेला एक वर्ष पुर्ण होण्याच्या निमित्ताने 29 नोव्हेंबर रोजी संसदेकडे मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

थोडक्यात बातम्या

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

येरवडा कारागृहात आमदार चक्क चावला कैद्याला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

क्रांती रेडकरच्या ‘त्या’ कथित चॅटचे स्क्रिनशॉट नवाब मलिकांनी केले शेअर

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More