मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारींची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र भेटीच कारण सांगितलं नसल्याने ही भेट कशासंदर्भात आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भेट झाल्यानंतर खुद्द राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कोरोनाच्या काळात जनतेचे अतोनात हाल झाले. अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत. वीज बिलाचाप्रश्न मार्गी लागला पाहिजे. भरमसाठ वीजबिल आली होतीत. ती अजुनही कमी झालेली नाहीत. त्यामुळे वीज बिल प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा केली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही. रेल्वे सगळ्यांसाठी सुरु नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नाही. मग सरकारचा काय उपयोग, असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, राज्यपालांसोबतच्या भेटीवेळी राज ठाकरेंसोबत चिरंजीव अमित ठाकरेदेखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला
‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा
खळबळजनक! मनसे नेत्याची तलवारीने वार करून हत्या