बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या ‘या’ जिल्ह्याच्या पॅटर्नची चर्चा संपुर्ण राज्यभरात सुरू

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना औरंगाबादमध्ये 16 हजारांवरून थेट 7 हजारांवर रुग्णसंख्या आल्याने कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर औरंगाबाद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

अवघ्या दीड महिन्यातच औरंगाबाद जिल्हा कोरोनावर विजय मिळवताना पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग दररोज 1700 ने वाढत होता. परंतु, हा आकडा आता 700 वर आल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवावा, अशा देखील चर्चांना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये राज्यात सर्वात आधी वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी कंट्रोल रूमही सर्वात आधी औरंगाबादमध्ये स्थापन करण्यात आली.

कडक नाकाबंदी आणि लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले आणि रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं सकारात्मक चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या औरंगाबाद पॅटर्नची चर्चा संपूर्ण राज्यभरात सध्या सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 10 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘अजितदादा मराठ्यांचा घात करू नका’; मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

‘या’ शहरात पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपाचा साठा चक्क एका दिवसात पुर्णपणे संपला

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मृत होणाऱ्यांची संख्याही वाढली

कोरोना रूग्णांसाठी वेबसाईट बनवणाऱ्या दहावीच्या मुलाला महापौरांनी दिली शाबासकीची थाप

पुणे पोलिसांनी वर्षभरात तब्बल एवढ्या पुणेकरांवर केली मास्क न वापरल्याबद्दल कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More