बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

मुंबई | आज विधानसभेचं आधिवेशन पार पडत आहे. केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, यासाठी महाविकास आघाडीनं आज अधिवेशनात ठराव मांडला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव मांडताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर पटलावर केला आहे. तर छगन भुजबळ यांनी देखील भाजपवर आरोप केले आहेत.

छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर प्रस्ताव मांडला. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय. छगन भुजबळ मोजकेच मुद्दे वाचत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केली आहे. ठराव मांडण्यासाठी सात दिवसांची नोटीस देणं अपेक्षित, सभागृहाचे नियम धुळीस मिळवले जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांच्या या प्रश्नांवर छगन भुजबळ यांनी उत्तरे दिली. त्यांच्या या उत्तरावर फडणवीस पुन्हा प्रश्न उपस्थित केले आणि छगन भुजबळ हे विधानसभेत खोटं बोलत आहेत, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे . त्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांच्याविरूद्ध बोलण्यास उभं राहून आपला मुद्दा मांडला होता. राज्य मागासवर्गीय आयोगाला केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळालेला नाही, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. त्यानंतर सभागृहात भाजपने गोंधळ घातला.

दरम्यान, भुजबळांकडून फडणवीस सरकारमधील ओबीसी आरक्षणावरील पत्रव्यवहाराचा उल्लेख करत विरोधकांना उत्तर दिलं आहे. 2017 ला केस सुरु झाली, पण 2019 पर्यंत फडणवीस सरकारनं काहीच केलं नाही, असा आरोप छगन भुजबळ यांनी भाजपवर केला आहे. त्यानंतर अध्यक्षांनी प्रस्ताव मत मोजणीसाठी ठेवला. त्यानंतर विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली.

थोडक्यात बातम्या-

एमपीएसीच्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

‘अनिल देशमुख मला असंच मधात बोलले होते आता ते…’; मुनगंटीवारांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ

‘स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या’; सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More