पाटणा | बिहारमधील विभूतीपूरी तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. संबंधित घटनेमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. त्यानंतर नराधमांनी तिला नग्नावस्थेत विजेच्या खांबाला बांधलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये महिलेची प्रकृती प्रचंड बिघडली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
संबंधित महिला बिहारमधील चकहबीब गावात लग्नासाठी आली होती. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले असता यामध्ये बँड आणि तंबु वाले देखील आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी महिला शौचासाठी शेतात गेली होती. यादरम्यान काही लोकांनी तिचं अपहरण करुन तिला दूर शेतात नेलं.
महिलेला घेऊन गेल्यानंतर संबंधित आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली. आरोपी एवढ्या वरच थांबले नाहीत. नराधमांनी महिलेला नग्नावस्थेत विजेच्या खांबेवर फासावर लटकवून तिथून पळ काढला. अशातच काही गावकऱ्यांना जाग आली आणि त्यांनी महिलेला तातडीने खाली उतरवलं.
दरम्यान, गावकऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र महिलेची प्रकृती खालवल्याने तिला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तसेच गावकऱ्यांनी बँड वाल्यांना बंदी बनवून तेच आरोपी असल्याचं सांगितलं आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”
ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश
‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!
सावधान! कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ आजाराचा धोका
पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.