Top News देश

शेतकरी आंदोलन: देशात असंतोष पसरवण्याचा आरोप, 21 वर्षीय दिशा रवीला अटक

Photo Courtesy- Facebook/Disha Ravi

नवी दिल्ली | ग्रेटा थनबर्ग टूलकीट प्रकरण आता चांगलंच तापलं असून दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी २१ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवीला अटक केली आहे. तिच्या अटकेचे पडसाद आता देशभरात उमटत असून काँग्रेस पक्षासह शेतकरी आंदोलकांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने रविवारी तिला बंगळुरुतून अटक केली, त्यानंतर तिला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टापुढे हजर करण्यात आलं. यावेळी दिशाला रडू कोसळलं. आपण या टुलकीटमधील फक्त दोन ओळी एडिट केल्याचं दिशानं कोर्टाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा दावा केला आहे. टूलकीट तयार करण्यात तसेच ते व्हायरल करण्यात दिशाची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या मते खलिस्तानी समर्थक गट पोएटिक जस्टीस फाऊंडेशनसोबत मिळून देशात असंतोष पसरवण्यासाठी काम करत होती. दिल्ली पोलिसांनी दिशाचा मोबाईल देखील जप्त केला आहे.

दिशानं दिलेलं टुलकीट ग्रेटा थनबर्गनं आपल्या सोशल मीडिया खात्यावरुन शेअर केलं होतं. त्यात काही संवेदनशील गोष्टी असल्याचं लक्षात आल्यानंतर दिशाच्या सांगण्यावरुनच तीनं ते डिलीट केलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या प्रकरणात त्या व्हॉट्सअप ग्रुपमधील आणखीही काही जणांचा शोध पोलीस घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

नाद करा पण आमचा कुठं?; दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यानं हेलिकॉप्टर घेतलं

महाराष्ट्रातील ‘या’ शहरानं रचला इतिहास, पेट्रोलनं शतक ठोकलं!

प्रवासात आजपासून ‘ही’ गोष्ट अनिवार्य, अन्यथा भरावी लागेल दुप्पट रक्कम!

IPLच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकरनं दाखवला चमत्कार, एका षटकात 5 षटकार

उडता रहाणे! मराठमोळ्या अजिंक्यचा झेल सर्वांना अचंबित करणारा, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या