Top News देश

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

Photo Courtesy- Facebook/Disha Ravi

नवी दिल्ली | 19 वर्षीय स्विडीश ग्रेटा थनबर्ग हिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टूलकिट म्हणजेच गुगलचे डॉक्युमेंट बनवलं होतं आणि या टुल-किटमध्ये एखादा हॅशटॅग ट्रेण्ड करणं किंवा एखादं कॅम्पेन चालवणं या संदर्भातल्या आखण्या केलेल्या असतात.

टूलकिटमध्ये असलेल्या माहितीनुसार त्या-त्या अकाउंटला टॅग करणं, मेंशन करणं आणि आपला ट्रेण्ड किंवा हॅशटॅग चालवणं हा उद्देश असतो. याच ग्रेटा थनबर्गने प्रसिद्ध केलेल्या टूल किटला 3 फेब्रुवारी रोजी 21 वर्षीय दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीने आपल्या मोबाईलमधून एडिट करून ते पुढे पाठवलं, त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करून दिल्ली पोलिसांनी शनिवारी तिला अटक केली.

टुलकिट हे डिजीटल शस्त्रं आहे. याचा उपयोग आंदोलनाला सोशल मीडियावर हवा देण्यासाठी होतो. याच टूलकिटमधील माहिती ही खालिस्तानी समर्थक ‘पोएटिक जस्टिस फाउंडेशन’ या गटाशी संबंधित असल्याचं पोलिंसाच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झालं आहे. या किटमध्ये डिजिटल हल्ला करण्यासाठी योजलेल्या गोष्टींची यादी आणि संपूर्ण माहिती असते.

या सर्व प्रकरणात 26 जानेवारी आणि त्याआधी या मार्फत हल्ला करण्याचे नियोजन होतं. सरकारविरोधी कारवाया करणं आणि धार्मिक, सांस्कृतिक तेढ निर्माण करणं शिवाय एखाद्या समूहाला निशाणा करून त्यांच्यामध्ये द्वेष पसरवणं हा त्याचा उद्देश असतो.

थोडक्यात बातम्या-

‘एका निशस्त्र तरुणीला बंदुकीवाले घाबरले’; दिशा रवीच्या अटकेनंतर प्रियंका गांधी संतापल्या

140 किलो वजनाचा गोलंदाज सगळ्या बांगलादेशला पुरुन उरला, लावला धक्कादायक निकाल!

मालक दिलदार, कुत्रा मालामाल; बनला एका रात्रीत 36 कोटीचा मालक

पी. बी. सावंत कोण होते?, जाणून घ्या संपूर्ण कारकीर्द

मराठी माध्यमातून शिक्षण, बीएमसीनं नोकरी नाकारली!; शिक्षक मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या