बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर

मुंबई | दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. नारायण राणेंच्या या खळबळजनक दाव्यानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकारण रंगायला सुरूवात झाली. अनेक दावे व गौप्यस्फोटानंतर दिशाच्या मृत्यूवर अखेर तिच्या आई-वडिलांनी मौन सोडलं आहे.

बिझनेस डील रद्द होत असल्याने दिशा तणावात होती. याबद्दल तिने घरी देखील सांगितलं होतं. ऑफिसमधील ताणतणावातून तिने आत्महत्या केली, असा खुलासा दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचं राजकारण करू नका, असं अवाहनही दिशाच्या आई-वडिलांनी केलं आहे.

दिशाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचं कारण स्पष्ट येऊनही तिची हत्या झाली, तिच्यावर बलात्कार झाला, असं सांगून तिची बदनामी का करत आहात?, असा संतप्त सवाल दिशाच्या आईने उपस्थित केला आहे.

दरम्यान, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आम्हाला खूप त्रास होत असल्याचं दिशाच्या आई-वडिलांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“दिशा सालियन प्रकरणाचा लवकरच उलगडा होणार, सर्व पुरावे तयार”

दारू पिण्याचं वय केलं कमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

उर्फी जावेदचे ‘या’ दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली…

“उद्धव ठाकरे स्वत: दारू पित नाहीत, मग जनतेला वाईन का पाजत आहेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More