Top News सोलापूर

“जिल्हा परिषदेच्या शाळांना नावं ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच योग्य उत्तर”

सोलापूर | सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डिसले यांच्या घरी जाऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार केलाय.

यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, “जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांची मुलं खासगी शाळेत शिकतात. जिल्हा परिषदेच्या शाळांची स्तिथी आणि दर्जा दोन्हीही सुधारतोय. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांना नावं ठेवणाऱ्यांसाठी डिसले गुरुजी हेच उत्तर आहे.”

भरणे पुढे म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर अभिमान असेल तर त्यांनी पहिल्यांजा त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत घालावीत, जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी आत्मीयता निर्माण होण्यास मदत होईल.”

“जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून डिसले गुरुजींचा गौरव होणं अभिमानास्पद आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाचा जागतिक पातळीवर सन्मान होणं यापेक्षा दुसऱी अभिमानाची गोष्ट नाही,” असं म्हणत भरणे डिसले यांना शुभेच्छा दिल्यात.

महत्वाच्या बातम्या-

भारताला मोठा धक्का; हा स्टार खेळाडू झाला दुखापतग्रस्त!

अखेर मोदी सरकार नमलं; शेतकऱ्यांना दिली ‘ही’ परवानगी!

निलेश राणेंचं आक्षेपार्ह ट्विट; महाविकास आघाडीतील पक्षांना दिली ‘ही’ शिवी!

“ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्रपक्षांनीच रचला सापळा”

“तारक मेहता का उल्टा चष्मा” मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीनं केली आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या