Top News

“मुख्यमंत्री महोदय, डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा”

मुंबई | सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात झालाय. यानंतर आता डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदाराच्या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीये.

शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या तसंच स्टुडंट हेल्पिंग युनिटच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करावा, असं म्हटलंय. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.

“रणजितसिंह डिसले यांना जागतिक स्तरावरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक आहेत. त्यांचं सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केलं जातंय, मात्र अशा व्यक्तींना आपण ‘महाराष्ट्र भूषण’ द्यावा, असं मला वाटतं,” असं आकांक्षा चौगुले यांनी पत्रात नमूद केलंय.

“महाराष्ट्र भूषण हा राज्यातील सन्मानाची सर्वोच्च खूण आहे. त्यामुळे डिसले गुरुजी यांना पुरस्कार देऊन आपण फक्त एका व्यक्तीचा सत्कार करणार नसून प्रत्येक खेड्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाचा सन्मान करणार आहात,” असंही त्यांनी पत्रात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

“पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यांनी आता हिमालयात जायला हवं”

धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…

दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या