बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

मुंबई | आज मराठा क्रांती मुक आंदोलनाचा पहिला मोर्चा कोल्हापूरात निघणार आहे. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या विषयासोबतच इतर 11 मागण्या मराठा समाजाने सरकारपुढे मांडल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील मराठा समाजाच्या आंंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील आता पेटत आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं राज्य सरकारने तात्काळ ओबीसी जनगणना करावी. यासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आहे. मात्र याबाबतचा अध्यादेश अजूनही काढण्यात आलेला नाही. यासोबतच मागासवर्गीय आयोगामध्ये जे सदस्य घेण्यात आले आहेत. ते सदस्य राजकीय पक्षाचे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यामध्ये तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून बदल करावेत, अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

केवळ मराठा आरक्षण नाही, तर ओबीसी आरक्षण, पदोन्नती मधील आरक्षण याबाबतही संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. खासदार संभाजीराजे छत्रपती हे केवळ मराठा समाजाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाबाबतची आपली भूमिका देखील स्पष्ट करावी, असं देखील प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत. ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल तर ओबीसी कल्याण मंत्रालय तात्काळ बरखास्त करा, अशी आक्रमक भूमिका देखील त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण या तीनही विषयावरून ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. तर पदोन्नतीतील आरक्षणावरून ठाकरे सरकारला खुद्द काँग्रेसच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे भाजपने ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

गजा मारणेवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना उच्च न्यायालयाने फटकारलं

अशी असेल मराठा क्रांती मुक आंदोलनाची रूपरेषा; वाचा सविस्तर माहिती

बँकेच्या 650 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडुन अटक

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली, पण सक्रिय रुग्णसंख्येत घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More