“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”
मुंबई | रयत क्रांती संघटना केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे. यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्याचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दिलीये.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी, कामगार, लघुउद्योजक अशा प्रत्येक घटकांच्या प्रश्नावर अपयशी ठरलं आहे. केवळ सत्ता टिकवण्यासाठी व मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींवर दररोज हल्ले होत आहेत. म्हणून रयत क्रांती संघटनेतर्फे 25 मेपासून 5 लाख पत्र केंद्र सरकारला पाठवण्याचे अभियान चालवणार आहे, असं शिंदेंनी सांगितलं आहे.
जनतेचे अतोनात हाल होत असून महाविकास आघाडी सरकार हे फक्त टीव्हीत व घरात बसून सरकार चालवत आहे, असंही शिदेंनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत
“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”
‘कोण किरीट सोमय्या?’, संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात
“एका रात्रीत ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येला जायला निघाले”
‘दरेकर साहेब…’; रोहित पवार आणि दरेकरांमध्ये रंगला ट्विटर वॉर
Comments are closed.