सांगली | राज्य सरकारकडून किराणा दुकांनामध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावरून वेगवेगळ्या स्तरांवरून राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच आता शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे.
राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. तसेच यावेळी बोलतांना संभाजी भिडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तूती केली आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार खरोखर चांगले आहे. भगवंताची कृपा म्हणून मिळालेले पंतप्रधान आहेत. लाल बहाद्दुर शास्त्री जसे अफाट चांगले होते तसेच नरेंद्र मोदी आहेत, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
त्यांचे मन मी जाणतो. त्यांनी देशातील दारूला तिलांजली देणारा निर्णय लोकसभेमध्ये घटनादुरूस्ती करून द्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयामुळे तरूणाई व्यसनाच्या विळख्यात जाईल, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय संतापजनक आणि नाश करणारा आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याने असले निर्णय घ्यायचे नसतात तर समाजाला दिशा द्यायची असते. आर. आर आबांनी डान्स बार बंद केले. आर. आर आबा असते तर घातकी निर्णय झाला नसता. या निर्णयामधून नेमके काय साधायचे आहे तेच मला कळत नाही. तसेच मराठा आरक्षणाचा उल्लेख यावेळी संभाजी भिडे यांनी केला. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. अनेक संघटना याविषयी रस्त्यावर आल्या पाहिजेत, असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर
“‘मद्य’राष्ट्र बनविण्यसाठी नेमकी कोणाशी डील झाली?”; फडणवीसांचा सरकारवर घणाघात
नवजोत सिंह सिंद्धूच्या अडचणी वाढल्या, बहिणीनेच केले ‘हे’ गंभीर आरोप
लसीकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती; आता नाकावाटेही घेता येणार कोरोना लस
Pro Kabaddi Leauge: पुणेरी पलटणनं नोंदवला सलग तिसरा विजय
Comments are closed.