Ladki Bahin Yojana | राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. सध्या महायुती सरकार या योजनेमार्फत लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. महायुतीत तिन्ही पक्ष या योजनेचा जोरदार प्रचार करताना दिसत आहे. मात्र आता या योजनेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय.
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचं श्रेय घेण्यावरुन महायुतीतील घटकपक्षात चढाओढ निर्माण झाल्याचं चित्र आहे. याला कारण ठरलेत अजित पवार. कारण
लाडक्या बहिणीमुळे 3 भावांमध्ये वाद
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
या जाहिरातीवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी थेट लाडकी बहीण योजनेचे (CM Ladki Bahin Yojana) श्रेय एकट्यानेच घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जाहिरातीतून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच वगळला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे.
‘माझी लाडकी बहीण योजना -महिन्याला दीड हजार रुपये, दादाचा वादा लाभ आणि बळ’ असा उल्लेख करत जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये वापरण्यात आले आहेत. यामुळे सगळीकडे दादाच पुढे दिसत असल्याने यावर महायुतीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून जास्तीत जास्त महिलांना आपल्या पक्षाकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. लाडकी बहिण योजनेचं श्रेय सरकारचं असून अजित पवार त्यांचं नाव पुढे करत असून यावर महायुतीतील नेत्यांचं म्हणणं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण नेमकी कुणाची?, अजित पवारांना मान्य नाही ‘मुख्यमंत्री’ शब्द?
शुभमन गिलचे ‘या’ अभिनेत्रीसोबतचे ते फोटो व्हायरल, लोक म्हणाले…
ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मोठी अपडेट, आराध्याला अडवलं!
बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळीचं वादग्रस्त वक्तव्य! होतय प्रचंड व्हायरल
अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट