Mahayuti | राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण हे ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार असून यात मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे.
महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आणि भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असेल असं त्यांनी कालच जाहीर केलं. अशात आता खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलीये.
मुख्यमंत्रीपदानंतर आता खात्यांवरून महायुतीत वाद सुरू असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार गृहखातं हे शिवसेना शिंदे गटाला हवं असल्याची माहिती समोर आलीये.
शिंदे गटाची मागणी
गृहखातं हे महत्त्वाचं खातं मानलं जातं. हे खातं आपल्याकडे असावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. यापूर्वी हे खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. पण ते खातं आपल्याला मिळावं, अशी शिंदे गटाची मागणी आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या अंतिम निर्णयासाठी भाजपचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार तसेच शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे गुरुवारी राजधानी दिल्लीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तिघांचीही चर्चा होणार आहे. चर्चेअंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…
मुंबईकरांनो काळजी घ्या!, हवामान खात्याकडून महत्त्वाची माहिती समोर
निवडणूक आयोगानं बातमी तर शेअर केली, मात्र कमेंट सेक्शन बंद करुन ठेवला!
…अन्यथा 2100 रूपये मिळणार नाहीत; लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट
पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्यासाठी मोठा….”