बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंमधील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. शुक्रवारी बीडच्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा नेहमीप्रमाणे दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंनी भाजपला घरचा आहेर देत आमच्या पक्षातील लोकांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या भूमिकेत राहून काम करावं, असं म्हटलं होतं.

पंकजा मुंडेंच्या या घरच्या आहेराची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना पंकजा मुंडेंनी स्वपक्षावर केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता, तर त्यांनी तडकाफडकी उत्तर देण्याचं टाळत पत्रकार परिषद सोडली.

भाजपकडून सतत सरकार पाडण्याचं मुहूर्त सांगण्यापेक्षा आपण आपल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजे, असा अप्रत्यक्ष टोला पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला होता. पण पंकजांच्या प्रश्नाला फडणवीसांनी उत्तर देेण्याचं टाळत पत्रकार परिषद सोडल्यानं फडणवीस आणि मुंडे यांच्यातील वाद पुन्हा शिगेला पोहचताना दिसत आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंनी 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर फडणवीस आणि मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं पहायला मिळालं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंमधील वाद शिगेला पोहचण्याची चिन्हं दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

“वाटलं तर तुम्ही जो बायडन यांनाही प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही”

टीम इंडीयाचा नवीन कोच ठरला, ‘या’ खेळाडूने स्विकारली जबाबदारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More