दत्ता गाडेने पीडितेला 7500 रुपये का दिले?, स्वारगेट अत्याचार प्रकरणाला धक्कादायक वळण

Swargate Case

Swargate Case l पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे.

आरोपी आणि पीडित तरुणीमध्ये पैशांवरून वाद झाला होता, त्यामुळे तिने बलात्काराचा आरोप केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. आरोपीच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि दत्तात्रय गाडे यांची ओळख एक महिन्यापूर्वी स्वारगेट बस डेपोमध्ये झाली होती.

गाडेने वकिलांना सांगितले की, “मी तिला कुठलीही बळजबरी केली नाही. तिनेच मला बोलावले आणि आम्ही बसमध्ये गेलो. तिने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले.” तसेच, त्या ठिकाणी तरुणीचा एक एजंटही (Agent) उपस्थित होता, असेही गाडेने सांगितले.

Swargate Case  l ‘बलात्कार झालाच नाही’ :

“पिडीत तरुणीवर बलात्कार झालाच नाही. दोघांमध्ये जे घडले ते संमतीने झाले,” असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. तसेच, दत्तात्रय गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखत होते, त्यांचे कॉल रेकॉर्ड्स (Call records) तपासल्यास सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.

दत्तात्रय गाडे पळून गेला नव्हता, तर तो आपल्या गावी गेला होता. गावात पोलिस (Police) मोठ्या संख्येने आल्याने तो लपून बसला होता, अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली.

News title : “Dispute Over Money”; Accused’s Lawyer’s Claim in Swargate Assault Case

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .