बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई?; विभागीय आयुक्तांचा निर्णय, महाजनांचा जीव टांगणीला!

नाशिक | शिवसेनेनं नगरसेवक फोडल्यामुळे भाजपवर नामुष्की ओढावली आहे. राज्यातील नगरसेवकांची ही मोठी फूट ठरली आहे. त्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत दिले होते. या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, यासाठी भाजपकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आलीये. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याचं सांगितलं जात आहे.

जळगाव महापालिकेतील भाजपच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली होती. यामध्ये बहुमत असतानाही शिवसेनेनं भाजपचे 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली आहे.

भाजपने दाखल केलेली तीस हजार पानांची ही याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, जळगाव महानगरपालिकेवर अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांंचं जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र असं असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपचे 27 तर एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली आहे.

थोडक्यात बातम्या

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; ‘ऑपरेशन लोटस’ची चौकशी होणार

आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार- तृप्ती देसाई

“शिवसेना मी घराघरात पोहोचवली, मीच स्वत: राजीनामा देणार होते”

“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

उद्धव ठाकरेंना फोन करून नरेंद्र मोदींनी केली रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More