बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

18 वर्षांवरील कोरोना लसीकरणावर विघ्न; मुंबई महापालिका आयुक्त म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचं जाहीर केलं आहे. पण मुंबई महापालिका 18 वर्षांच्यावरील नागरिकांना 1 मे पासून लगेच लस देणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईमध्ये सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा मर्यादित असल्याने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देणं शक्य होणार नसल्याचं मत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान 1 मे पासून सर्वांनाच लसीकरण करायला सुरुवात केली तर लसींचा साठा अपुरा पडून लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होईल, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना लसींच्या संदर्भात महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असंही आयुक्तांनी बोलून दाखवलं. त्यामुळे या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात काल एका दिवसात तब्बल 5 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राने लसीकरणात नवा विक्रमाची नोंद केली असल्याचं स्पष्ट झालं. लसीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग येत असला तरी काही ठिकाणी मात्र लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार यामधून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

रश्मी शुक्ला यांना सायबर सेलचं समन्स; फोन टॅपिंग प्रकरण अंगलट येण्याची शक्यता

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

“भारतीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळू दे”; पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारताबद्दल संवेदना

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

कोरोना लसींच्या किमती कमी करण्याचे सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More