Top News

भारतात फेब्रुवारीपासून ‘कोव्हिशील्ड’च्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

नवी दिल्ली | ‘कोव्हिशील्ड’ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल, अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशील्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे.

सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिलीये.

आम्ही महिन्याला 50 ते 60 कोटी लशींची निर्मिती करत आहोत. फेब्रुवारी महिन्यापर्यंती ही क्षमता 100 कोटींपर्यंत वाढवण्यात येईल, असं पुनावाला यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार!

पुण्यातील ‘या’ भागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’; नितेश राणेंची जहरी टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या