बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

मुंबई | राज्याच्या सहकाराचा कणा म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना(District co-opreative bank) ओळखण्यात येतं. राज्यातील बहुतांक्ष जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचा निकाल (Results) घोषित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सहकारी बॅंक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (Satara District Bank) ओळखण्यात येतं. सातारा जिल्हा बॅंकेच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (NCP Mla shashikant shinde) यांना पराभवाचा झटका त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी दिल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर साताऱ्यात समर्थक आणि विरोधक यांच्यात चांगलाच राडा पहायला मिळत आहे. अशातच शशिकांत शिंदे यांच्या पराभवात मोठी भूमिका निभावणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे यांनी तुफान डान्स केला आहे. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याच्या बोलावर वसंतराव यांनी तुफानी डान्स केल्यानं सर्वत्र चर्चा आहे.

शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणार आहे. पण त्यांच्या पराभवाला स्वपक्षीय नेत्यांच्या गद्दारीची किनार असल्याचं सातारा जिल्ह्यात बोललं जात आहे. सर्वपक्षीय पॅनल असूनही ज्ञानदेव रांजणे यांनी शशिकांत शिंदे यांना पराभवाचा झटका दिला आहे. ज्ञानदेव रांजणे हे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांना पराभवाचा झटका बसला होता. त्यानंतर आता जिल्हा बॅंकेत जाण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. परिणामी शशिकांत शिंदे यांच्या पराभवानं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह समोर आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘त्या’ बहूचर्चित पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पुर्ण

कृषी कायद्यांवर पुन्हा चर्चा?, केंद्रीय कृषीमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद

“जेवढा गुन्हा त्या नराधमांचा आहे, तेवढंच पाप आघाडी सरकारचं आहे”

‘त्या’ राड्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले…

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More