बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांची दमदार कामगिरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पटकावलं रौप्यपदक

टोकियो | टोकियोमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाची ऐतिहासीक कामगिरी या टोकियो शहरात झाली. आता इथेचं भारतीय पॅराऑलिम्पिक संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहे.

भारतीय बॅडमिंटन खेळाडू आणि नोएडाच्या गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी रौप्यपदक पटकावलं आहे. भारतीय बॅडमिंटन खेळाडूने फ्रान्सच्या जागतीक नंबर एक खेळाडूला कडवी झुंज दिली. आपल्या अदम्य साहसाच्या जोरावर सुहास यांनी रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

सुहास यांनी ग्रुप ए मधील दोन्ही सामने जिंकले होते. त्यांनी पुढच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  इंडोनेशियाच्या हॅरी सुसांतो याला 21-6, 21-12 अशा फरकाने पराभूत केलं. अंतीम सामन्यात मात्र सुहास यांना नंबर एकच्या खेळाडूकडून मात पत्करावी लागली. त्यांच्या या ऐतिहासीक कामगिरीने भारताचा पदकाचा आकडा 18 झाला आहे.

आतापर्यंत भारतीय पॅरालिम्पिक संघाने इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. भारतीय संघाची पदकांची घौडदौड अजूनही चालूच आहे. सुहास यांच्या या कामगिरीने देशभरात आनंदाचं वातावरण आहे. देशासाठी जिल्हाधिकारी म्हणून आपलं कर्तव्य बजावणारे सुहास हेे आता देशासाठी रौप्यपदक मिळवणारे जिल्हाधिकारी ठरले आहेत.

थोडक्यात बातम्या 

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“ज्यांना इतिहास घडवता येत नाही ती माणसं इतिहास पुसतात”

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेनं दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट!

“राज्यपाल सरळमार्गी गृहस्थ आहेत, पण शेवटी ते भाजपला जे हवंय तेच करतील”

मुंबईकरांच्या डोक्याला ताप, कोरोनातून सावरताच दुसऱ्या आजाराचं भूत मानगुटीवर, हॉस्पिटल्स भरली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More