बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

उस्मानाबाद | महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच बंद झालेले कोरोना सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. परंतु, आता महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील 45 कोरोना सेंटरपैकी 30 सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

उस्मानाबादमध्ये गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृतांची संख्या वाढली होती. पण हळूहळू हा आकडा कमी झाला आणि सक्रियबाधितांची संख्याही कमी झाली. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 30 कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या सेंटरमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 45 कोविड केअर सेंटर आहेत. त्यापैकी फक्त 15 सेंटर आता सुरू राहणार असून इतर 30 सेंटर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास हे सेंटर पुन्हा सुरू होतील. कारण, हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल- चंद्रकांत पाटील

कसोटी विश्वचषकात ‘या’ भारतीय गोलंदाजाने मिळवले सर्वाधिक बळी, फलंदाजीत टॉप 3 मध्ये एकही भारतीय नाही

“तुमच्यात दम नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो”

कोरोनाकाळात आता सरपंचांना मिळणार विमाकवच; ‘या’ जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

रिलायन्सच्या 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लसीकरण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More