बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारला कसं अडचणीत आणायचं?, फडणवीसांच्या घरी प्लॅन ठरला

मुंबई | येत्या 5 आणि 6 जुलैला राज्याचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून अधिवेशन घेण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे अधिवेशन केवळ 2 दिवसांचं असल्यानं अधिवेशन विरोधी पक्ष चालू देणार की नाही, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

येत्या सोमवारपासून या अधिवेशनास सुरवात होत असल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या घरी बैठकीचा जोर वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींचं सत्र सुरू झालं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर अनेक मंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर हजेरी लावली होती.

राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. संपूर्ण अधिवेशन झालं असतं तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारने यापेक्षा अजून छोटे अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले आहे. कोरोना, शेतकऱ्यांचे  प्रश्न आदींवरून दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला आम्ही कोंडीत पकडू, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, या अधिवेशनात विरोधकांनी गोंधळ घातला नाही तर, अनेक विधकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार विविध विषयांवर विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर कारवाईची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

उद्या गोळ्या जरी घातल्या तरी विचारांपासून मागे हटणार नाही- गोपीचंद पडळकर

आषाढीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय- संभाजी भिडे

‘…पण तुम्ही त्या अगोदरच जेलमध्ये असाल’; निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र

“…तर किसान सभा राज्य सरकारचा कठोर प्रतिकार करेल”

लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या लसीकरण मोहिमेला पुन्हा लागणार ब्रेक!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More