बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आलिया-रणबीरच्या लग्नानंतर 14 वर्षांनी होणार घटस्फोट, लग्नाविषयी ‘या’ व्यक्तीने केली भविष्यवाणी

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट दोघेही त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे सतत चर्चेत आहेत. एवढच नाही तर त्यांच्या लग्नाला घेऊन त्यांचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत. मात्र लग्नाची तारीख अद्याप समोर आली नसून एका अभिनेत्याने त्यांच्याबाबत क्रूर अशी भविष्यवाणी केली आहे. यावेळी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांचा घटस्फोट होईल, असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे.

केआरके म्हणजेच, कमाल आर खाननं ट्वीट करत हा दावा केला आहे. रणबीर कपूर आणि आलियाचं लग्न 2022 पर्यंत होईल आणि लग्नाच्या 15 वर्षांनी दोघांचा घटस्फोट होईल. केआरकेनं केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी तर केआरकेवर टीकेची झोड उठवली आहे. रणबीर-आलियाच्या चाहत्यांनी केआरकेला चांगलंच फैलावर घेतलं आहे. एका युजरनं केआरकेला उत्तर देताना म्हटलं आहे की, “देवा… तुम्ही महान आहात, सकाळी-सकाळी एवढं वाईट तुम्ही कसे बोलू शकता?”.

सोशल मीडियावर केआरके आलिया-रणबीरच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या अंदाजाबद्दल बर्‍यापैकी ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर केआरकेला ट्रोल केले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तो बर्‍याच वेळा ट्रोल झाला आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

दरम्यान, आलिया आणि रणबीर गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबीयांकडूनही परवानगी मिळाली आहे. आलिया अनेकदा रणबीरच्या घरातील कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येते.

पाहा पोस्ट:

थोडक्यात बातम्या-

“माझ्या पक्षाचं काम करताना कोणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही”

उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा- अतुल भातखळकर

मी राजकियदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे- उद्धव ठाकरे

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…त्यामुळे पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत- चंद्रकांत पाटील

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More