बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

मुंबई | बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’चा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी पार पडला. यामध्ये दिव्या अग्रवालने बाजी मारली आहे. दिव्या अग्रवालने करण, शमिता शेट्टी, राकेश बापट, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांना मागे टाकत ट्रॉफी खिशात घातली आहे.

बिग बॉस ओटीटीची विजेती ठरल्यामुळे दिव्याला बिग बॉस ट्रॉफी तसेच 25 लाख रुपये मिळाले आहेत. या ग्रँड फिनालेला बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख यांंनी हजेरी लावली होती.

‘बिग बॉस ओटीटी’चे टॉप 5 स्पर्धक शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे होते. या पाच स्पर्धकांपैकी बिग बॉस ओटीटी ट्रॉफी आपल्या घरी कोण घेऊन जाणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

दिव्या अग्रवाल अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने रागिनी एमएमएस रिटर्न्स वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तसेच ती बिग बॉसमधील माजी स्पर्धक प्रियांक शर्मा याच्यासोबत नात्यामध्ये राहिली आहे. त्यानंतर दोघेही वेगळे झाले होते. दोघांचे ब्रेक अप प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

थोडक्यात बातम्या- 

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

‘राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नसतील तर…’; शशी थरूर यांचं मोठं वक्तव्य!

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More