Divya Bharti | 90 चं दशक गाजवणारी बाॅलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीच्या चित्रपटाची आज सुद्धा चर्चा होत असते. आपल्या चित्रपटातील भूमिकेने सुद्धा दिव्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. फक्त हिंदीच नाही तर, दिव्याने तेलगु चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आज देखील दिव्याचे चाहते तिचे चित्रपट आवडीने पाहत असतात. दिव्याच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टी हादरली होती. दरम्यान तिच्या मृत्यूबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
काय आहे प्रकरण?
दिव्याच्या (Divya Bharti) मृत्यूनंतर साजिद नाडियावालवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याबद्दल गुड्डी मारुतीने काही खुलासे केले आहेत. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना गुड्डी मारुती म्हणाली की, दिव्याला उडी मारताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. पुढे ती म्हणाली की, दिव्या ही एक चांगली मुलगी होती.
मात्र, दिव्या कायम अस्वस्थ असायची. दिव्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आजच आपला शेवटचा दिवस आहे अशी ती जगायची. तेव्हा ‘शोला और शबनम’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. 5 एप्रिल रोजी दिव्याचं निधन झालं आणि 4 एप्रिलला माझा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही पार्टी करत होतो.
उंचीची भीती वाटत नाही-
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गोविंदा, साजिद हे उपस्थित होते. दिव्या पार्टीमध्ये सर्वांसोबत बोलत होती. पण मला ती नाराज वाटत होती. तिला सकाळी आउटडोर शुटसाठी जायचं होतं. पण शुटला जाण्याची दिव्याची इच्छा नव्हती.
दिव्या (Divya Bharti) पाचव्या मजल्यावर राहायची. एका रात्री मी आईस्क्रिम घेण्यासाठी खाली उतरले. तेव्हा मागून मला कोणीतरी आवाज देत होतं. मी वर पाहिल्यानंतर दिव्या मला बाल्कनीमध्ये बसलेली दिसली. मी तिला सांगितलं हे सेफ नाही, तेव्हा दिव्या मला म्हणाली, ‘काही होणार नाही. मला उंचीची भीती वाटत नाही. यावेळेस साजिद कार घेऊन खाली आला आणि ते पाहण्यासाठी दिव्या वाकली आणि पाचव्या मजल्यावरुन खाली पडली, असा खुलासा गुड्डी मारुतीने केला.
News Title : divya bharti death reveals by guddi murti
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर दीपिकाचा लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर
महायुतीला 80 टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागा- संभाजी पाटील निलंगेकर
एका झटक्यात झालेल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमका काय?
4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य