एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवलेत की ते वेडे झालेत- दिवाकर रावते

आैरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढले आहेत की तेच आता वेडे झाले आहेत, असं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. ते औरंगाबामधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

एसटी महामंडळामधील पगाराचे आणि कामाच्या स्वरुपाबद्दल रावतेंना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रावतेंनी अहंकारी भाषेत उत्तर दिलं.

कुणी सांगितलं तुम्हाला? कुठल्या सालात जगता आपण? एवढचं विचारायतोय मी तुम्हाला कारण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढलेत. ते एवढे वाढले आहेत की तेच आता वेडे झाले आहेत. मी हे अधिकृतपणे बोलतोय, असं उत्तर रावतेंनी दिलं.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्या वक्तव्यावरून टीका होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“खुद्द शरद पवार मोदींविरोधात बोलत नाहीत, कार्यकर्त्यांनी का न्यूनगंड बाळगायचा?”

-#MeToo | एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीवर विनयभंगाचा आरोप

-महात्मा गांधी काँग्रेसच्या नव्हे भाजपच्या विचारांचे- गिरीश महाजन

-शशी थरुर यांच्या floccinaucinihilipilification शब्दाची एकच चर्चा

-ते विखेंना खूश करण्यासाठी बोलले; मात्र नगर सोडणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या