घरातील ‘या’ तीन वस्तू फेकून द्या; दिवाळीला होईल भरभराट

Diwali 2024 Do not keep these items at home

Diwali 2024 | भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे. यावर्षीच्या दिवाळी सणाला आजपासून (28 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. आज वसुबारस सण आहे. आजच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. गाय आणि वासराच्या अतूट प्रेमाचं प्रतीक म्हणजेच वसुबारचा सण. या दिवशी गाईच्या पायावर पाणी घालून तिला ओवाळलं जातं. गंध लावला जातो. तसेच, चारा खायला दिला जातो. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही गाईची पूजा केली जाते. (Diwali 2024)

दिवाळी या सणापूर्वीच घरातील स्वच्छता केली जाते. घरातील भंगार साहित्य, खराब झालेल्या वस्तू फेकून दिल्या जातात. बरेच जण घराला रंगरगोटी देखील करतात. घर अगदी स्वच्छ आणि नवीन दिसेल अशी साफ-सफाई केली जाते. तुमच्याही घरात अशा भंगार वस्तू असतील, तर त्या आताच कचऱ्यात टाकणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.

घरात ‘या’ वस्तु ठेवू नका

प्रकाशाचा हा सण आजपासून सुरू झाला आहे. या दिवशी श्री गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पण त्यापूर्वी स्वतःच घर, दुकानं किंवा ऑफिस जवळपास प्रत्येकजण स्वच्छ  करतात. घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होऊन तिचा आशीर्वाद कायम राहावा, यासाठी घर सजविले जाते. ही स्वच्छता करताना अनेक जण अशा वस्तू घरात ठेवतात, ज्या खराब झालेल्या असतात आणि निरूपयोगी असतात. पण मुळात अशा वस्तू घराबाहेर फेकणे अधिक चांगले असते. (Diwali 2024)

तुमच्या घरात गंजलेल्या वस्तू ठेवल्या असतील तर दिवाळीच्या साफसफाईदरम्यान त्या अगोदर फेकून द्या. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतात. या गोष्टींमुळे तुमच्या घरात वास्तुदोष, राहू आणि केतूदोष निर्माण होतो. यामुळे तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

त्यासोबतच घरामध्ये तुटलेल्या मूर्ती ठेवणं शुभ मानलं जात नाही. घरात तुटलेल्या मूर्ती असतील, तर तुमच्या घरात भांडणं, कलह होऊ शकतात. अशा मूर्ती तुमच्या आर्थिक नुकसानीचं कारण ठरू शकतात. त्यामुळे अशा मूर्ती घरात न ठेवता त्या स्वच्छ तलावात किंवा नदीत विसर्जित करा. तसेच, घरातील खराब झालेल्या इलेक्ट्रिक वस्तू आजच घराबाहेर फेकून द्या. या वस्तुमुळे शनिदोष येतो. ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण बिघडते.त्यामुळे दिवाळीपूर्वी अशा वस्तू घराबाहेर फेकून द्यायला हव्यात. (Diwali 2024)

News Title –  Diwali 2024 Do not keep these items at home

महत्त्वाच्या बातम्या-

चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?

आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त

वंचितची आठवी यादी जाहीर, आदित्य व अमित ठाकरेंविरोधात दिले उमेदवार

जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात!

कॉँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, पाहा कोण कुठून लढणार?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .